काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी बुधवारी केरळमधील वायनाडमध्ये रोड शो केला, जिथे ते लोकसभेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा जनतेचा जनादेश मागत आहेत. तर वायनाडमधील सुलतान बथरी येथे हजारो पक्षाचे कार्यकर्ते आणि समर्थक रोड शोसाठी आले होते.
राहुल गांधी हे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राज्यात आले असून ते संध्याकाळी कोझिकोडमध्ये युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट (यूडीएफ) च्या रॅलीला संबोधित करणार आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातील अनेक कार्यक्रमांमध्ये भाग घेणार आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी सर्व 20 मतदारसंघात मतदान होत असलेल्या केरळमध्ये सोमवारी उच्च-वोल्टेज राजकीय हालचाली पहायला मिळत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही राज्यात प्रचार सभा घेतल्या.
आज PM मोदी तिरुअनंतपुरम आणि त्रिशूर येथे दोन जाहीर सभांना संबोधित करणार आहेत. तर राहुल गांधी यांचा सामना सीपीआयच्या ॲनी राजा आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन यांच्याशी आहे.