श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अयोध्येत रामनवमी उत्सवासंदर्भात असणाऱ्या नवीन व्यवस्थांची माहिती दिली. श्री रामजन्मभूमी मंदिरात मंगला आरतीनंतर ब्रह्म मुहूर्तावर पहाटे साडेतीन वाजल्यापासून अभिषेक शृंगार आणि दर्शन एकाच वेळी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. पहाटे ५ वाजता शृंगार आरती होईल. श्री रामललाचे दर्शन व सर्व पूजाविधी पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार आहेत. त्यांनी सांगितले की दर्शनाची वेळ वाढवून 19 तास करण्यात आली आहे, जी मंगल आरतीपासून रात्री 11 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. देवाला प्रसाद अर्पण करण्यासाठी प्रत्येकी दिवसातून पाच मिनिटेच पडदा बंद राहणार असल्याची माहिती चंपत राय यांनी दिली आहे.
पडदा बंद असताना प्रतीक्षा काळात भक्तांनी प्रभू श्रीरामाचे स्मरण करावे आणि शिस्त पाळावी अशी विनंती त्यांनी भक्तांना केली आहे. रात्री 11 वाजेपर्यंत दर्शन सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर भोग व शयन आरती होतील.
चंपत राय पुढे म्हणाले की, यात्रेकरू जेवढे मोबाईल, शूज, चप्पल, मोठ्या पिशव्या आणि बंदी असलेल्या वस्तू इत्यादी सुरक्षितपणे दूर ठेवतील, तितकीच दर्शनासाठी अधिक सोय होईल. दर्शन मार्गावरील प्रवासी सुविधा केंद्रात रेल्वे आरक्षण केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
त्यांनी सांगितले की 16, 17, 18 आणि 19 एप्रिल रोजी सुगम दर्शन पास, व्ही.आय.पी. दर्शन पास, मंगला आरती पास, शृंगार आरती पास आणि शयन आरती पास बनवले जाणार नाहीत म्हणजेच कोणत्याही प्रकारचे पास जारी केले जाणार नाहीत. म्हणजे वरील दिवशी सर्व सुविधा रद्द राहतील.
चंपत राय म्हणाले की, ‘श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ तर्फे श्री रामजन्मभूमी प्रवेशद्वारावर, बिर्ला धर्मशाळेसमोर, सुग्रीव किल्ल्याच्या खाली एक प्रवासी सेवा केंद्र उभारण्यात आले आहे. ज्यामध्ये सार्वजनिक सुविधा उपलब्ध आहेत.
श्री रामजन्मभूमी मंदिरात होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण अयोध्या महानगरपालिका क्षेत्रातील जवळपास 80 ते 100 ठिकाणी एलईडी स्क्रीन वर दाखवण्यात येणार आहे. हे कार्य प्रसार भारतीच्या वतीने श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी करण्यात आले आहे. त्याचे थेट प्रक्षेपण उपलब्ध होणार आहे.
त्यांनी सर्व भाविकांना विनंती केली की,रामनवमीच्या दिवशी घरी बसून किंवा कुठेही, मोबाईल, टेलिव्हिजन आणि एलईडी स्क्रीनवर बसून सर्व कार्यक्रमांचा आनंद घ्यावा. स्क्रीन बघून, भगवान श्री राम जीचा आशीर्वाद घ्या,आणि राम नवमीनंतर तुमच्या सोयीनुसार अयोध्या धामला या, भगवान श्री राम लल्लाजींचे दर्शन घ्या आणि प्रसाद घ्या. त्यांनी भक्तांना रामनवमीच्या दिवशी अनावश्यक धावपळ आणि त्रास टाळा.असे सुचवले आहे