राज्याच्या वातवरणात गेले काही दिवस सातत्याने बदल पाहायला मिळत आहेत. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. एकीकडे प्रचंड कडक उन्हाळा जाणवत आहे. उन्हाने लोकांना दुपारच्या वेळेस बाहेर पडणे अशक्य झाले आहे. मात्र या उन्हाच्या लाहीमध्ये IMD राज्यातील नागरिकांसाठी एक चांगली बातमी आणली आहे. यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. देशात १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज IMD ने वर्तविला आहे.
यंदा येणारा मान्सून हा नेहमीपेक्षा अधिक असणार आहे. राज्यात देखील यंदा मान्सून चांगला राहणार आहे. जून ते सप्टेंबर या महिन्यात राज्यात चांगला पाऊस होणार आहे. यंदाच्या मान्सूनसाठी नेहमीपेक्षा अधिक चांगली स्थिती असण्याची शक्यता आहे. ८ जूनपर्यंत मांसून येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पुढील अंदाज हा मे महिन्याच्या शेवटी जाहीर करण्यात येणार आहे. त्यानंतर मान्सूनचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.