आयपीएलमध्ये काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज या दोन संघात सामना पार पडला. या सामन्यात चेन्नईने २० धावांनी मुंबईला पराभूत केली आहे. रोहित शर्माने केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली आहे. दरम्यान कालच्या सामन्यात अखेरचे षटक हार्दिक पंड्याने टाकले. त्यामध्ये महेंद्रसिंह धोनीने २० धावा काढल्या. त्याच २० धावांमुळे मुंबईचा पराभव झाल्याचे म्हटले जाते. मुंबईच्या पराभवाला हार्दिक पंड्या जबाबदार असल्याचे माजी भारतीय खेळाडूने म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/C5wMdjbSKfX/?utm_source=ig_embed&utm_campaign=embed_video_watch_again
भारताचा माजी गोलंदाज इरफान पठाणने कालच्या सामन्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. हार्दिक पांड्याला त्याच्या गोलंदाजांवर विश्वास नसल्याचे त्याने म्हटले आहे. नबी आणि गोपाळ यांनी चांगली गोलंदाजी केली होती. श्रेयस गोपाळने पहिल्या षटकात विकेट घेतली होती. मात्र त्यानंतर हार्दिकने त्यांना गोलंदाजानी दिलीच नाही. शेवटचे ओव्हर टाकण्यासाठी मढवाल असताना देखील हार्दिकने स्वतः ओव्हर टाकली.
आयपीएल सुरु झाल्यापासून कोणत्याही सामन्यात हार्दिकला कर्णधाराला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. फलंदाजीमध्ये देखील त्या चांगली खेळी करता आलेली नाही. सहा सामन्यात हार्दिकने १३१ धावत केल्या आहेत. गोलंदाजीत त्याने ११ ओव्हर्स टाकले आहेत आणि तीन विकेट्स प्राप्त केल्या आहेत.