देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. दरम्यान पंतप्रधान मोदी आपल्या प्रचारसभांमध्ये २०४७ च्या भारताबद्दल भाष्य करत आहेत. ANI च्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी भाजपा संविधान बदलणार असल्याच्या मुद्द्यांवर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.
“जेव्हा मी म्हणतो की माझ्याकडे मोठ्या योजना आहेत, तेव्हा कोणी घाबरू नये. मी कोणाला घाबरवण्यासाठी निर्णय घेत नाही, मी देशाच्या सर्वांगीण विकासासाठी निर्णय घेतो. शिवाय, सरकारे नेहमी म्हणतात की आम्ही सर्व काही केले आहे. मला विश्वास नाही की मी सर्वकाही योग्य दिशेने करण्याचा प्रयत्न केला आहे, तरीही मला खूप काही करण्याची आवश्यकता आहे, कारण मी पाहतो की माझ्या देशाच्या अनेक गरजा आहेत. म्हणूनच मी म्हणतो की हा ट्रेलर आहे,”असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
यंदाच्या निवडणुकीत एनडीए म्हणजेच भाजपा सरकारने अब की बार ४०० पार चा नारा दिला आहे. त्यात भाजपाने ३७० तर एनडीएने ४०० जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे. भाजपचे स्टार प्रचारक त्यामध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील प्रचारसभा घेत आहेत. १० वर्षात झालेले काम तर फक्त ट्रेलर असून, पुढील पाच वर्षांत अजून मोठे निर्णय होणे बाकी आहे असे मोदींचे सांगणे आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत जनता कोणाला साथ देणार हे पाहणे महत्वाचे
ठरणार आहे.