लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रात काही जागांवरचा तिढा अजूनही कायम दिसत आहे. महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरून अजूनही नाराजीनाट्य सुरु आहे. ठाकरे गटाला ही जागा गेल्याने स्थानिक काँग्रेस नेते अजूनही नाराज आहेत. त्यामुळे नाराज असलेले विशाल पाटील यांनी अखेर आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता सांगलीच्या जागेवर तिरंगी लढत होणार आहे जवळपास निश्चित झाले आहे.
विशाल पाटील यांनी आपल्या काही मोजक्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीचे चंद्रहार पाटील, भाजपचे संजय पाटील आणि आता अपक्ष विशाल पाटील यांच्यात लढत होणार आहे. विशाल पाटील हे अपक्ष उभे राहिल्याने चंद्र्हार पाटलांना फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. सांगलीच्या काँग्रेस नेत्यांनी जागा आपल्याला मिळावी यासाठी दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट घेतली. मात्र त्याचा काही फायदा झाला नाही. आता विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.