जम्मू-काश्मीरमधून (Jammu-Kashmir) एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रीनगरमधील झेलम नदीत (Jhelum River) एक बोट उलटली आहे. या अपघातात 10 शालेय विद्यार्थ्यांसह अनेक जण बुडाले आहेत. सध्या येथे बचावकार्य सुरू आहे.
या बोटीमध्ये शालेय विद्यार्थी तसेच काही स्थानिक लोक होते. त्यांना घेऊन जाणारी ही बोट गांदरबलहून बटवारा येथे जात होती. त्यावेळी ही बोट अचानक पलटली आणि हा अपघात घडला. तसंच या अपघातात काही लोक बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एसडीआरएफने बचाव कार्य सुरू केले असून बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात आहे. तर तेथील स्थानिक लोकांनी या घटनेनंतर लगेचच SDRF आणि इतर अधिकाऱ्यांना माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने झेलमसह अनेक जलकुंभांची पाणीपातळी वाढल्याचे सांगण्यात येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने नदीचा प्रवाह खूप वाढल्याचे स्थानिकांनी सांगितले. यामुळेच झेलममध्ये बोट उलटली. झेलम नदीबद्दल बोलायचे झाल्यास, ती प्रामुख्याने उत्तर-पश्चिम भारत तसेच उत्तर आणि पूर्व पाकिस्तानची नदी मानली जाते. पंजाब प्रदेशातील पाच नद्यांपैकी झेलम ही पश्चिमेकडील नदी आहे. ती पूर्व पाकिस्तानातील सिंधू नदीला मिळते. ही एक नदी आहे जी काश्मीरच्या खोऱ्यांना अधिक सुंदर बनवते.