ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने (Glenn Maxwell) त्याची आयपीएल 2024 (IPL 2024) टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर म्हणजेच RCB सोडली आहे. तो IPL 2024 मधून अनिश्चित काळासाठी बाहेर आहे. आयपीएलच्या या मोसमात त्याची कामगिरी खराब होती.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला दुखापतही झाली होती, पण आता त्याने स्पर्धेतून माघार घेतली आहे. त्याने क्रिकेट ऑस्ट्रेलियाला सांगितले की, मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे त्याने आयपीएल 2024 मधून माघार घेतली आहे. तथापि, त्याने म्हटले आहे की जर तो मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करू शकला तर तो आयपीएल 2024 च्या उर्वरित भागासाठी संघात परत येऊ शकतो.
फॉक्स क्रिकेटनुसार, ग्लेन मॅक्सवेलने मानसिक आणि शारीरिक थकव्यामुळे इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मधून अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे. तर T20 कर्णधार मिचेल मार्श हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर ऑस्ट्रेलियात आहे आणि बोर्डाची वैद्यकीय टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने आयपीएल 2024 च्या सातव्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलला संधी दिली नाही. तो तंदुरुस्त असूनही खराब कामगिरीमुळे त्याची निवड झाली नाही. या टी-20 स्पर्धेतील पहिल्या 6 सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही, हे त्यामागचे कारण स्पष्ट दिसत होते. मात्र, त्यानी स्वत: निवड होण्यास नकार दिला. सहा डावात त्याच्या बॅटमधून केवळ 32 धावा आल्या, ज्यामध्ये तो तीन वेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला.
RCB बद्दल बोलायचे तर IPL 2024 च्या पॉइंट टेबलमध्ये टीम शेवटच्या स्थानावर आहे. आरसीबीने सातपैकी केवळ एकच सामना जिंकला आहे.