Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खान (Salman Khan) याच्या घराबाहेर रविवारी पहाटे पाचच्या सुमारास दोन अज्ञातांनी गोळीबार (Firing) केला होता. या घटनेनंतर सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. तसेच या प्रकरणात कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा भाऊ अनमोल बिश्नोईचा हात असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. तसंच आज मुंबई क्राईम ब्रांचच्या टीमने या प्रकरणातील दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
या प्रकरणातील दोन्ही आरोपींना मुंबई क्राईम ब्रांचने गुजरातमधून ताब्यात घेतले आहे. आरोपींना भुज येथून 48 तासांच्या आत अटक करण्यात आली. त्यानंतर आज त्यांना मुंबई आणण्यात आले असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यावेळी सुनावणीदरम्यान दोन्ही आरोपींना 10 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी आरोपींच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. पण त्यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, विकी गुप्ता आणि सागर पाल अशी या प्रकरातील दोन्ही आरोपींची नावे असून या दोघांनी सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला होता.