देशात युपीएससी परीक्षेचा निकाल अखेर जाहीर झाला आहे. त्यामुळे युपीएससी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची चिंता मिटली आहे. हा निकाल विद्यार्थी upsc.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकणार आहेत. आदित्य श्रीवास्तव हा विद्यार्थी युपीएससी परीक्षेत देशात पहिला आला आहे. यंदाच्या परीक्षेत मुलांचे वर्चस्व अधिक दिसून येत आहे. युपीएससी सीएसई मेन्स परीक्षेत १,०१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. आता त्या विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २०२३ चा युपीएससी मेन्स परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत लखनौच्या आदित्य श्रीवास्तव याने अव्वल क्रमांक पटकवला आहे. अनिमेश प्रधान हे दुसऱ्या क्रमांकांवर आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य निकालात नियुक्तीसाठी एकूण १,०१६ उमेदवारांची शिफारस केली आहे. हा निकाल विद्यार्थी upsc.gov.in या वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकणार आहेत.