देशातील वातावरण सध्या काही प्रमाणात बदलत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, बर्फवृष्टी, अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाचा इशारा राज्यात कायम आहे.
विदर्भ, मराठवाड्यला पुढील चार-पाच दिवसांत अवकाळी पावसाने झोडपून काढले आहे. पुढील २४ तासांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उत्तर कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यांसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि अन्य ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा फटका बसत आहे. विदर्भात हजारो हेक्टर भागाचे नुकसान झाले आहे. देशातील अनेक भागांत पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. १७ एप्रिलपर्यंत देशातील अनेक राज्यात अवकाळी पावसाचा, तर उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.