लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बहुजन समाज पार्टीला मोठा धक्का बसला आहे. राजस्थानमध्ये पक्षाला मोठा फटका बसला आहे. राजस्थानमध्ये बहुजन समाज पक्षाला (बसपा) मोठा धक्का बसला आहे. राज्यातील पक्षाच्या दोन आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मंगळवारी (16 एप्रिल) मुंबईत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत चुरू जिल्ह्यातील सादुलपूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मनोज न्यांगली आणि बारी येथील जसवंत सिंग गुर्जर यांनी बसपा सोडून शिवसेनेत प्रवेश केला. या दोन्ही आमदारांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राजस्थान विधानसभेत बसपाच्या आमदारांची संख्या आता ० झाली आहे. २००८ आणि २०१८ मध्ये निवडणूक जिंकल्यानंतर बसपाच्या आमदारांनी यापूर्वी दोनदा पक्ष बदलले आहेत.
नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपने दोन जागा जिंकल्या होत्या. सादुलपूर मतदारसंघात मनोज न्यांगली यांनी काँग्रेसच्या कृष्णा पुनिया यांचा २४७५ मतांनी पराभव केला. बारीमध्ये जसमवत सिंग गुर्जर यांनी तीन वेळा आमदार आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरराज सिंह मलिंगा यांचा २७,४२४ मतांनी पराभव केला.