Ekntah Khadse : ज्येष्ठ नेते आणि आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यांना चार वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकीचे फोन आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसंच एकनाथ खडसेंना ही धमकी छोटा शकील गँगकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी खडसेंनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
एकनाथ खडसे यांना दाऊद छोटा शकील गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खडसेंना वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात आली आहे. पहिल्या फोनवरून सांगण्यात आलं की, दाऊद छोटा शकील गँग तुम्हाला मारणार आहे, हे आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्यानंतर दुसऱ्या वेळी फोन आला तेव्हा सांगितलं की, तुम्हाला आम्ही सांगितलं तरी तुम्ही कोणती पावले उचलली नाहीत. तर या फोननंतर एकनाथ खडसेंनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
एकनाथ खडसेंना 4 ते 5 वेळ फोन आला आहे. त्यांना एक फोन अमेरिकेवरून आला आहे तर एक फोन लखनऊ येथून आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर पोलीस या प्करणाचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, याआधी देखील खडसेंना धमक्या देण्यात आल्या होत्या.