छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी २९ नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुरक्षा यंत्रणांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नक्षलवाद देशातून संपवला जाईल असे अमित शहा म्हणाले. मंगळवारी झालेल्या चकमकीबद्दल पत्रकारांना माहिती देताना मुख्यमंत्री विष्णू देव साई म्हणाले, या चकमकीत २९ नक्षलवादी मारले गेले आहेत. सुरक्षा दलांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. हे आतापर्यंतचे सर्वात यशस्वी नक्षलवाद्यांच्या विरोधातील अभियान असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
एनआयएशी बोलताना केंद्रीय गृहमंत्र्यानी सुरक्षा दलांचे कौतुक केले. नक्षल्यांच्या दहशतवादावर सुरु असलेल्या कारवाईत कठोर आणि योग्य गुप्त माहितीच्या आधारे सुरक्षा दलांना छत्तीसगड पोलिसांकडून योग्य पाठिंबा मिळत आहे. अमित शहा म्हणाले, ”काल छत्तीसगडमध्ये सुरक्षा यंत्रणांना मोठे यश मिळाले आहे. जेव्हापासून मोदी पंतप्रधान झाले आहेत तेव्हापासून, नक्षलवाद आणि दहशतवाद विरोधात भाजपा सरकार अभियान चालवत आहे. भाजपाचे सरकार आल्यावर या अभियानाला वेग आला आहे. आम्ही सुरुवात केली आहे. आम्हाला छत्तीसगड पोलिसांकडून नक्षलवादाच्या विरोधात मदतीसाठी पहिल्यापेक्षा अधिक समर्थन मिळत आहे.”