लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने आज रामनवमीच्या दिवशी रामराज्याच्या संकल्पनेवर आधारित आपली वेबसाइट सुरू केली आहे.ज्याचे नाव आहे. ‘रामराज्य’ . जनता ह्या ‘आपका रामराज्य डॉट कॉम’ ला भेट देऊन बघू शकेल की आम आदमी पार्टी रामराज्याच्या संकल्पनेवर कशा प्रकारे काम करत आहे असे ह्या पक्षाच्या सदस्यांचे म्हणणे आहे.
लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाने ही वेबसाइट सुरू केली आहे, जेणेकरून लोकांना त्यांच्या पक्षाचे काम पाहता येईल. दिल्ली आणि पंजाब राज्यात रामराज्य संकल्पनेवर केलेल्या कामाची माहिती वेबसाइटवर देण्यात आली आहे. गुजरात आणि गोव्यात त्यांच्या आमदारांनी केलेली कामेही दाखवली आहेत.
आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी सांगितले की, भगवान श्री राम नवमीच्या मुहूर्तावर रामराज्य वेबसाइट लॉन्च करण्यात आली. आमचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आपल्यासोबत नसतानाची ही पहिली रामनवमी आहे.ते तुरुंगात आहेत.खोट्या विधानाच्या आधारे त्यांना आज तुरुंगात टाकण्यात आले आहे.
दिल्ली सरकारमधील मंत्री आतिशी म्हणाल्या की की, रघुकुलची परंपरा नेहमीच पाळली पाहिजे, एखाद्याचे प्राण गेले तरी, वचन गमावू नये.यातून प्रेरणा घेऊन अरविंद केजरीवाल गेल्या नऊ वर्षांपासून काम करत आहेत. भगवान श्रीरामांनी 14 वर्षे वनात राहून आपले वचन पाळले. अरविंद केजरीवालही संघर्ष करत आहेत. आज त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्यात आले आहे. दिल्लीत शाळा, पाणी, वीज आदींची योग्य व्यवस्था ठेवण्याचा निरोप ते तुरूंगांतून देत असतात. ते तिथे राहून कुटूंबासारख्या असलेल्या जनतेची काळजी करतात. तुमच्या रामराज्य वेबसाइटवर दिल्ली आणि पंजाबमध्ये शिक्षण, आरोग्य, वीज, हुतात्म्यांचा सन्मान इत्यादीसाठी केलेले कार्य पहा आणि काम पाहून मतदान करा.असे आवाहन अतिशी यांनी जनतेला केले आहे.
दिल्ली सरकारमधले मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, रामराज्य म्हणजे ज्यामध्ये कोणालाही कोणतीही अडचण येत नाही. रामराज्यात कोणाला मानसिक किंवा शारीरिक त्रास नव्हता. प्रत्येकाने आपापल्या धर्माचे पालन केले.जिथे कुठलाही भेदभाव नव्हता अरविंद केजरीवाल जेव्हा त्यांच्या दिल्ली आणि पंजाब मॉडेलबद्दल बोलतात तेव्हा ते अश्याच प्रकारचे सरकार असावे असे म्हणतात.