Ratnagiri-Sindhudurg Loksabha : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून मोठा गोंधळ निर्माण झाला होता. ही लोकसभेची जागा कोणाला मिळणार यावरून संभ्रम होता. पण आता अखेर जागेचा तिढा सुटला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग हा मतदारसंघ भाजपला मिळाला असून या जागेवर नारायण राणे (Narayan Rane) यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
सिधुदुर्गमध्ये नारायण राणे हेच उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे या मतदारसंघात तसा प्रचार देखील केला जात होता. तसेच नारायण राणे यांना निवडून द्या, असं आवाहन शालेय मंत्री दीपक केसरकर यांनी मतदारांना केलं होतं. त्यामुळे नारायण राणे हेच या मतदारसंघातील उमेदवार असतील अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच आता भाजपने राणेंच्या नावाची अधिकृत घोषणा केली आहे.
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात महाविकासआघाडीकडून खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघात विनायक राऊत आणि नारायण राणे हे एकमेकांच्या विरोधात लढताना दिसणार आहेत.