Anant Ambani : काल (17 एप्रिल) संपूर्ण देशभरात रामनवमीचा (Ram Navami) मोठा उत्साह पाहायला मिळाला. तर या खास सणादिवशी रिलायन्स समुहाचे प्रमुख मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) यांचा दानशूरपणा पहायला मिळाला. अनंत अंबानी यांनी दोन मंदिरांमध्ये मोठी रक्कम दान केली असल्याची माहिती समोर आली आहे.
अनंत अंबानी यांनी रामनवमीनिमित्त दोन मोठ्या मंदिरांमध्ये तब्बल पाच कोटी रूपयांचं दान केलं आहे. डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार अनंत अंबानी यांनी पुरी येथील जगन्नाथ मंदिरात तब्बल 2.51 कोटी रूपये दान केले आहेत. ते मंगळवारी रात्री जगन्नाथ मंदिरात दर्शनासाठी पोहोचले होते. दर्शन घेतल्यानंतर ते आसामला रवाना झाले. आसाममध्ये त्यांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले. तसंच या मंदिरातही त्यांनी 2.51 कोटी रूपये दान केले आहेत.
अनंत अंबानी यांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाहीये. पण याआधीही अंबानी कुटुंबीयांकडून अशा पद्धतीची मोठी रक्कम अनेक मंदिरांमध्ये दान करण्यात आली आहे. त्यामुळे ही त्यांची पहिलीच वेळ नाहीये.
दरम्यान, अनंत अंबानी यांचा हा दानशूरपणा पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले आहे.