लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान उद्या म्हणजे १९ एप्रिल रोजी होणार आहे. दरम्यान महाराष्ट्रात आणि देशातील जनतेचे लक्ष हे बारामती लोकसभा मतदारसंघाकडे लागले आहे. अजित पवार हे शरद पवारांपासून लांब आले. महायुतीत सामील झाले. त्यानंतर महायुतीने सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना बारामतीतून तिकीट दिले आहे. आज सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान त्यानंतर झालेल्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब की बार सुनेत्रा पवार अशी घोषणा दिली आहे.
सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मोठी प्रचारसभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ”बारामतीत परिवर्तन अटळ आहे. आता भक्ती फिरवण्याची वेळ आली आहे. बारामतीकरणी १५ वर्षे खासदार म्हणून निवडून दिले. मात्र अब की बार सुनेत्रा पवार. आता भाकरी फिरवण्याची वेळ आली आहे. व्यासपीठावरील मान्यवरांची संख्या मोठी आहे. जनता सुनेत्रा ताईंना दिल्लीत नक्कीच पाठवतील. बारामतीच्या जनतेने पाटीवरत्न करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बारामतीत परिवर्तन ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. बारामतीचा चेहरा बदलण्याचे काम खऱ्या अर्थाने अजितदादांनी केले आहे. मात्र अजितदादांवर अन्याय झाला आहे. त्यामुळे ते आमच्यासोबत आले आहेत.
आज महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ पुण्यात सभा घेण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, रामदास आठवले खासदार मेधा कुलकर्णी आणि महायुतीचे अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होते. मोठे शक्तीप्रदर्शन करत सुनेत्रा पवारांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आपला लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे.