सध्या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार जोरदारपणे सुरु आहे. उद्या लोकसभेसाठी ७ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. भाजपाने यंदा अनेक विद्यमान खासदारांचे तिकीट कापत नवीन उमेदवारांना संधी दिली आहे. त्यातच भाजपाने अभिनेत्री कंगना रानौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी या लोकसभेचे तिकीट दिले आहे. दरम्यान काँग्रेसचे मंडी येथील उमेदवार आणि हिमाचल प्रदेश सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी कंगना रानौतवर टीका केली आहे. त्यांनी कंगनाची तुलना बेडकाशी केली आहे.
हिमाचल प्रदेशचे PWD मंत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांनी दावा केला आहे की, अभिनेत्री-राजकारणी कंगना रणौत ही ‘बेडूक’ सारखी आहे जी काही दिवसांच्या प्रचारानंतर नाहीशी होते. राज्यातील हवामान आल्हाददायक असल्याने कंगना रानौत या केवळ ‘दौऱ्यासाठी’ हिमाचल प्रदेशात आल्या असल्याचा आरोप सिंह यांनी केला. “कंगना रणौत आज इथे आहे. ती उद्या (येणाऱ्या दिवसात) परत येईल. ती पावसाळ्यात बाहेर पडणाऱ्या बेडकासारखी आहे,” सिंग म्हणाले. हिमाचल प्रदेशमधील सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे मंडीचे उमेदवार विक्रमादित्य सिंग हे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंग यांचे सुपुत्र आहेत.