देशातील वातावरण सध्या काही प्रमाणात बदलत आहे. काही ठिकाणी कडक उन्हाळा, बर्फवृष्टी, अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. पुढील दोन दिवसांमध्ये विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबई, ठाणे या ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच अवकाळी पावसाचा इशारा राज्यात कायम आहे. राज्यातील काही जिल्ह्याना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर काही ठिकाणी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.
विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा तर कोकणात उष्णतेच्या लाटेच्या अंदाज वर्तविण्यात आला आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. प्रादेशिक हवामान विभागाने उत्तर कोकणासाठी उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
पुढील २४ तासांमध्ये उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे, खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. कोकणात उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे. तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता आहे. काल पुणे शहरात देखील पावसाने हजेरी लावली. अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे राज्यातील बळीराजा संकटात सापडला आहे.