छत्तीसगडमधील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोंडागाव, नारायणपूर, चित्रकोट, दंतेवाडा, विजापूर आणि कोंटा येथे सकाळपासून मतदान सुरू आहे. मतदानाबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी मतदानासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
छत्तीसगड भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार किरण देव सकाळी जगदलपूरच्या बूथ क्रमांक 130 वर मतदानासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी बस्तरच्या जनतेला लोकशाहीच्या महान सणात जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजावून लोकशाही बळकट करण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.
छत्तीसगडमधील सुकमा या नक्षलग्रस्त जिल्ह्याच्या झालियारसमध्ये ग्रामीण भागात मतदारांची गर्दी होत आहे. तरूण, वयोवृद्ध, महिलांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत असताना, पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे.