Loksabha Election : आजपासून लोकशाहीच्या उत्सवाला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 102 जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात देखील 5 जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे.
आज पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे. यामध्ये अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री आणि नागपूर मतदारसंघातील उमेदवार नितीन गडकरी यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
नितीन गडकरी यांनी आपल्या कुटूंबासह मतदान केलं आहे. मतदान केल्यानंतर नितीन गडकरींनी लोकांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले. तसेच ते 101 टक्क्यांनी निवडून येतील, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला.