Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला आजपासून सुरुवात झाली आहे. देशातील 102 जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात देखील 5 जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे.
आज अनेक नेत्यांनी, सेलिब्रिटींनी आपला मतदानाचा हक्क बजावत त्यांनी जनतेला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोराडी येथे जाऊन मतदान केले आहे. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे रांगेत उभे राहून मतदान केलं आहे.
मतदान केल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी भारताचा संकल्प करत महायज्ञ केला आहे. या महायज्ञामध्ये प्रत्येक नागरिकाने मतदानाची आहुती द्यावी, असे आवाहन बावनकुळेंनी केले आहे. तसेच भाजप विदर्भातील पाचही जागा जिंकेल, असा विश्वासही बावनकुळेंनी व्यक्त केला.