Jyoti Amge : आजपासून लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 102 जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात देखील 5 जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे. (Nagpur Loksabha Election)
आज राज्यांमध्ये प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. मग सर्वसामान्य जनतेसह सेलिब्रिटी असो, राजकीय नेतेमंडळी असो असे प्रत्येकजण मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. यामध्ये आता जगातील सर्वात कमी उंचीच्या महिलेनं देखील मतदान केलं आहे.
ज्योती आमगे हीने नागपुरात जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. तसेत तिने जनतेला मतदान करण्यासाठी प्ररित देखील केले आहे.
ज्योती आमगे ही जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून ओळखली जाते. ज्योतीची उंची 2 फूट 1 इंच एवढी आहे, त्यामुळे तिला सर्वात लहान महिला म्हणून ओळखले जाते. सध्या ज्योती ही 30 वर्षांची आहे.