Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी आज (19 एप्रिल) गांधीनगर लोकसभा (Gandhinagar Loksabha) मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गांधीनगर मतदारसंघातून अमित शाह निवडणूक लढवणार आहेत. तर आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करताना अमित शाह यांच्यासोबत त्यांचे पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच यावेळी अमित शाह यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भुप्रेंद्र पटेल हे देखील उपस्थित होते. 400 पारचा नारा देत अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
दरम्यान, गुजरातमधील लोकसभेच्या सर्व 26 जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. तिसऱ्या टप्प्यात गुजरातमधील सर्व जागांवर 7 मे रोजी मतदान होणार आहे. तर देशातील सर्व 543 लोकसभेच्या जागांसाठी 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे.