Loksabha Election 2024 : आजपासून (19 एप्रिल) लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 102 जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील 5 जागांवर आज मतदान सुरु आहे. पूर्व विदर्भातील मतदारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. त्याचा फैसला 4 जून रोजी होणार आहे. राज्यात गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या मतदारसंघात मतदान होत आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोली-चिमूर, रामटेक, नागपूर, चंद्रपूर , भंडारा गोंदिया या 5 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत एकूण 19.17 टक्के मतदान झालं आहे. तर कोणत्या मतदारसंघात किती मतदान झालं याबाबत आता आपण जाणून घेणार आहोत.
रामटेक – 16.14% मतदान
नागपूर – 17.53% मतदान
चंद्रपूर – 18.94% मतदान
भंडार-गोंदिया – 19.72% मतदान
गडचिरोली चिमूर – 24. 88% मतदान
वरील आकेडवारीनुसार सर्वात कमी मतदान रामटेक येथे झाले आहे. तर सर्वाधिक मतदान हे गडचिरोली चिमूर या मतदारसंघात झालेलं आहे. गडचिरोली हा एक नक्षली भाग आहे त्यामुळे तिथे सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होणार आहे.