आरबीआय देशातील सर्वोच्च बँक आहे. काही नियमांचे पालन न केल्यामुळे
आरबीआयने देशातील पाच बँकावंर कारवाई केली आहे. विविध नियामक नियमांचे उलंघन
केल्यामुळे पाच बँकांवर कारवाई करण्यात आली आहे. या बँकांना ६० लाखांपेक्षा
जास्तीचा दंड ठोठावण्यात आला आहे. कारवाई करण्यात आलेल्या बँकांमध्ये कोणत्या
बँकांचा समावेश आहे, ते जाणून घेऊयात.
आरबीआयने राजकोट सहकारी
बँकेवर कारवाई केली आहे. या बँकेला तब्बल ४३.३० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला
आहे. नवी दिल्लीतील कांगडा सहकारी बँक, लखनौमधील राजधानी नगर सहकारी बँक, उत्तराखंडमधील सहकारी बँक, गढवाल या बँकांवर आरबीआयने कारवाई केली आहे. तीनही
बँकांना प्रत्येकी पाच लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याचबरोबर डेहराडून सहकारी बँकेला दोन लाखांचा
दंड ठोठावला आहे. या बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्यामुळे यांना कारवाईला सामोरे जावे
लागत आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी आरबीआयने IDFC FIRST या बँकेवर कारवाई केली होती.