आज देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. देशातील २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये १०२ जागांवर आज मतदान सुरू आहे. आज दुपारी १ वाजेपर्यंत देशभरात ३९. ९ टक्के मतदान झाले आहे. मध्य प्रदेशात दुपारी १ वाजेपर्यंत ४४ टक्के मतदान झाले, तर उत्तराखंडमध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ४३.१ टक्के, जम्मू-काश्मीरमध्ये ५३ टक्के, त्रिपुरामध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ५३ टक्के, महाराष्ट्रात ३२ टक्के, पश्चिमेत ५१ टक्के मतदान झाले. बंगाल, छत्तीसगड ४१.५ टक्के आहे.
पहिल्या टप्प्यात तामिळनाडूतील सर्व ३९ जागांवर, राजस्थानमधील २५ पैकी १२ जागांवर, उत्तर प्रदेशातील ८० जागांपैकी ८ आणि मध्य प्रदेशातील ६ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ५, आसाममधील ५, उत्तराखंडमधील ५, बिहारमधील ४, पश्चिम बंगालमधील ३, मेघालयातील २, अरुणाचल प्रदेशातील २ आणि मणिपूरमधील २ जागांवर मतदान होत आहे. याशिवाय पुद्दुचेरी, मिझोराम, छत्तीसगड, जम्मू-काश्मीर, लक्षद्वीप, सिक्कीम, त्रिपुरा, नागालँड आणि अंदमान निकोबारमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात एकूण 1625 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १४९१ पुरुष आणि १३४ महिला उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात ८ केंद्रीय मंत्री, २ माजी मुख्यमंत्री आणि एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत आहेत.
देशभरात मतदान होत असल्याने सुरक्षा व्यवस्था देखील तगडी ठेवण्यात आली आहे. नक्षली भागांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे. तसेच आज अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेसाठी देखील मतदान पार पडणार आहे. आज पहिल्या टप्प्यात २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांसाठी मतदान होत आहे. ज्यासाठी देशभरात १.८७ लाख मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.