भारत देश हा आजच्या काळात आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. संरक्षण क्षेत्रात तर भारताने खूप मोठ्या प्रमाणात विकास केला आहे. तसेच संरक्षण क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात निर्यात देखील करतो. २१ हजार कोटींपेक्षा जास्त निर्यात भारताने संरक्षण क्षेत्रात केली आहे. यामध्ये भारत आणि फिलिपाइन्स देशांत दोन वर्षांपूर्वी ब्राम्होस सुपरसॉनिक मिसाईल संदर्भात एक करार झाला होता. त्याअंतर्गत भारताने आज पहिल्या टप्प्यातील ब्राम्होस मिसाईल फिलिपाईन्सला सुपूर्त केली आहेत.
https://twitter.com/ANI/status/1781243663638536541
देशाच्या सुरक्षा क्षेत्रातील निर्यातीमधील हा सर्वात मोठा भाग आहे. देशाचे हे एक मोठे यश देखील आहे. भारत आणि फिलिपाइन्सध्ये ३७ कोटी ५० लाख डॉलरचा करार झाला होता. आज या करारानुसार भारताने क्षेपणास्त्रांचा पहिला संच फिलिपाइन्सला सुपूर्द केला. संरक्षण अधिकाऱ्यांनी सांगितले की भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टरने भारतीय विमानतळावरून फिलीपिन्सकडे ब्राम्होस मिसाईलसह उड्डाण केले. भारताच्या C-17 ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट प्लेनच्या मदतीने ही क्षेपणास्त्रे फिलिपाइन्सच्या विमानतळावर नेण्यात आली आहेत.