Diyanka Tripathi Accident : दिव्यांका त्रिपाठी दहिया (Diyanka Tripathi) ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा पती विवेक दहिया (Vivek Dahiya) देखील तिच्यासारखाच लोकप्रिय आहे. ते दोघे टीव्ही इंडस्ट्रीचे लोकप्रिय जोडपे आहेत. त्यांचा चाहतावर्गही मोठ्या संख्येत आहे. पण आता दिव्यांकाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. नुकताच दिव्यांकाचा अपघात झाला आहे.
विवेक दहियाने नुकतीच इन्स्टा स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आणि दिव्यांका त्रिपाठीच्या तब्येतीबाबतची अपडेट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने दिव्यांकाचा अपघात कसा झाला हे सांगितले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, “दिव्यांका बरी होत आहे. ही घटना काल संध्याकाळी घडली, जिथे ती उंचावरून पडली, त्यामुळे तिच्या दोन्ही हातांची हाडे तुटली. डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे. सर्व चाहते आणि मीडिया लोकांचे आभार. ज्याने इतकं प्रेम दिलं, दिव्यांका सध्या विश्रांती घेत आहे.”
विवेक दहिया याचे इन्स्टाग्राम लाइव्ह सत्र होणार होते, पण त्याला ते अचानक रद्द करावे लागले. विवेक आणि दिव्यांकाच्या टीमने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून यामागचे कारण सांगितले आहे.
या पोस्टमध्ये सांगितले आहे की, दिव्यांकाचा अपघात झाला आहे आणि विवेकला तातडीने तिकडे जावे लागले आहे. आम्हाला हे जाहीर करताना दुःख होत आहे की, विवेकचे उद्याचे लाइव्ह सत्र पुढे ढकलण्यात आले आहे. कारण, दिव्यांकाचा काही तासांपूर्वी अपघात झाला होता आणि आता ती वैद्यकीय देखरेखीखाली आहे. ती बरी होत आहे आणि विवेक तिच्यासोबत आहे. तसेच तुम्ही समजून घेतल्याबद्दल आणि तुमच्या समर्थनासाठी आणि दिव्यांका लवकर बरी होण्यासाठी प्रार्थना करा. विवेक लवकरच तुमच्या सर्वांमध्ये सामील होण्यास उत्सुक आहे”, असे विवेक आणि दिव्यांकाच्या टीमने सांगितले आहे.
नंतर विवेकने इंस्टाग्राम स्टोरीवर दिव्यांकाच्या एक्स-रेचा एक फोटो पोस्ट केला आणि तिची दोन हाडे मोडल्याचे उघड झाले. त्याने लिहिले की, “दिव्यांकाच्या हातातील दोन हाडे तुटली आहेत आणि उद्या शस्त्रक्रिया केली जाईल. तसेच सध्या तिची प्रकृती ठिक आहे,” असे विवेकने सांगितले आहे.
दरम्यान, दिव्यांका ही ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतून घराघरात पोहोचली आहे. ती ‘खतरों के खिलाडी’ या शोमध्ये देखील सहभागी झाली होती. तसेच ती रोहित शेट्टीच्या आवडत्या स्पर्धकांपैकी एक आहे. तर खतरों के खिलाडी 11 ची ती फर्स्ट रनर अप होती.