लोकसभा निवडणुकीच्या २०२४ च्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. यामध्ये २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसह एकूण १०२ जागांवर मतदान झाले. यावेळी पहिल्या टप्प्यात १,६०० हून अधिक उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आपले नशीब आजमावत होते. आता पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारीही समोर आली आहे. पहिल्या टप्प्यात २१ राज्यांमध्ये संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ६२.१८ टक्के मतदान झाले.
कोणत्या राज्यात किती टक्के झाले मतदान?
अंदमान निकोबार – 56.87%
अरुणाचल प्रदेश- 63.03%
आसाम- 70.77%
बिहार- 46.32%
छत्तीसगड- 63.41%
जम्मू आणि काश्मीर – 65.08%
लक्षद्वीप- 59.2%
मध्य प्रदेश- 63.25%
महाराष्ट्र- 54.85%
मणिपूर- 67.46%
मेघालय- 69.91%
मिझोराम- 52.62%
नागालँड- 55.72%
पुद्दुचेरी- 72.84%
राजस्थान- ५०.२७%
सिक्कीम- 67.58%
तामिळनाडू- 62.02%
त्रिपुरा-76.10%
उत्तर प्रदेश – 57.54%
उत्तराखंड- 53.56%
बंगाल- 77.57%
पहिल्या टप्प्यातील मतदानाच्या दिवशी दुपारी ५ वाजेपर्यंत ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे कळते आहे. देशातील २१ राज्यांमध्ये १०२ जागांवर आज मतदान होत आहे. महाराष्ट्रात ५ जागांवर मतदान होत आहे. १०२ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत राजस्थानमध्ये २२.५१ टक्के मतदान झाले. तर, सिक्कीमच्या ३२ विधानसभा जागांवर ४.६४ लाख मतदारांपैकी २१.२ टक्क्यांहून अधिक मतदारांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावला आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये मतदानादरम्यान दगडफेकीची घटना समोर आली आहे.