इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाने इस्रायलची आर्थिक राजधानी तेल अवीव येथे ३० एप्रिलपर्यंत उड्डाणांचे निलंबन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये एअर इंडियाने म्हटले आहे की, “तेल अवीवला जाणारी आणि तिथून येणारी आमची उड्डाणे बंद राहतील.मध्यपूर्वेतील सध्याची युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेता सध्यातरी 30 एप्रिल 2024 पर्यंत ही विमानसेवा निलंबित करण्यात आले आहे.
एअर इंडियाने पुढे सांगितले की, “परिस्थितीवर सतत लक्ष ठेवणे आणि ज्या प्रवाशांनी तेल अवीव आणि तेथून प्रवासासाठी बुकिंग केले आहे अशा प्रवाशांना मदत करणे. प्रवाशांसाठी पुढच्या फ्लाईट्सचे बुकिंग करणे आणि कॅन्सलेशनला मदत कंपनीकडून केली जाणार आहे.
टाटा समूहाची एअरलाइन एअर इंडियाने सुमारे 5 महिन्यांच्या कालावधीनंतर 3 मार्च रोजी इस्रायलच्या राजधानीसाठी सेवा पुन्हा सुरू केली होती, परंतु पुन्हा एकदा हल्ल्यामुळे उड्डाणे विस्कळीत झाली आहेत. इस्रायली शहरावर हमासच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने 7 ऑक्टोबर 2023 पासून तेल अवीवसाठी प्रथम उड्डाणे स्थगित केली होती.
यापूर्वी, एअर इंडियाचे तेल अवीव ते उड्डाण निलंबन 20 एप्रिलपर्यंत होते. तथापि, इराणवर आज इस्रायलने केलेल्या ताज्या हवाई हल्ल्यानंतर, एअर इंडियाने उड्डाणे निलंबनाची मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाची तेल अवीवला आणि तेथून आठवड्यातून परत येण्यासाठी तीनदा उड्डाणे आहेत.
यूएईची इतिहाद एअरवेज देखील तेल अवीव आणि अम्मानची सेवा रद्द करण्यात आली आहेत. . 13 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत तात्पुरते हवाई क्षेत्र बंद झाल्यामुळे, एमिरेट्स एअरलाइन्सनेही त्यांची काही उड्डाणे रद्द केली .इस्त्रायलने शुक्रवारी पहाटे इराणवर क्षेपणास्त्र हल्ला केला, त्यामुळे तणाव आणखी वाढला आहे.