राज्यातील वातावरणात सध्या काहीसे बदल पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. काही ठिकाणी उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. उष्णतेच्या लाटेमुळे दुपारच्या वेळेस घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. दरम्यान आज दुपारच्या वेळेस देखील पावसाळी वातावरण पाहायला मिळाले. शहरातील काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावल्याचे दिसून आले. सदाशिव पेठ, स्वारगेट परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.
गेले काही दिवस राज्यात उष्णतेची लाट, कडक उन्हाळा, अवकाळी पाऊस अशा प्रकारचे वातावरण पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा फटका विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळाला. अवकाळी पावसामुळे शेतकरी राजा संकटात सापडला आहे. फळबागांचे, तयार झालेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. कोकणात देखील आज पावसाची शक्यता वर्तविण्यात अली आहे.