पुण्यामध्ये दिवसभर उकाडा आणि संध्याकाळी पावसाळी वातावरण असा प्रकार मागील काही दिवसांपासून पाहायला मिळतो आहे. मात्र आज पुणे शहरातील वेगवेगळ्या भागात पावसाने हजेरी लावली आहे.जांभूळवाडी – कोळेवाडी, आंबेगाव बुद्रुक – खुर्द परिसरात पावसाच्या हलक्या सरी झाल्या आहेत. तर पेठ भागामध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वाऱ्यासह पाऊस कोसळला आहे.
उन्हाने त्रासलेल्या पुणेकरांना पावसाने आज हजेरी लावत सुखद दिलासा दिला आहे.
आज तीन तासांमध्ये विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यांसह काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार पुण्यात पावसाला सुरुवात झाली आहे.
पुणे शहरासह उपनगरातील भागांमध्ये देखील पाऊस पडला असल्याची माहिती समोर आली आहे.