Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप होणार असल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) हे शिंदेंकडून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मिलिंद नार्वेकरांना लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे नार्वेकरांना दक्षिण मुंबईतून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची ऑफर शिवसेनेकडून देण्याच आली असल्याची माहिती समोर आली आहे.
दक्षिण मुंबई जागेसाठी अद्याप महायुतीकडून उमेदवार घोषित करण्यात आलेला नाहीये. पण ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला देणार असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच या जागेसाठी महायुतीकडून राहुल नार्वेकर, मंगलप्रभात लोढा आणि यशवंत जाधव हे निवडणूक लढण्याच इच्छूक आहेत.
आता उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय मिलिंद नार्वेकर यांना एकनाथ शिंदेंकडून निवडणूक लढवण्याची ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसू शकतो.
मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय असून त्यांच्याकडे ठाकरेंची अनेक गुपिते दडलेली आहेत. तसेच मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक आहेत. पण आता त्यांना एकनाथ शिंदेंनी निवडणूक लढवण्याची ऑफर दिल्याने ते ठाकरेंची साथ सोडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.