PM Narendra Modi : यूपीमधील मुरादाबादमधील (Moradabad) भाजप उमेदवार सर्वेश सिंह (Sarvesh Singh Passed Away) यांचे निधन झाले आहे. तर सर्वेश सिंह यांच्या निधनावर पंतप्रधान मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पीएम मोदींनी त्यांच्या X हँडलवर लिहिले की, “मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह जी यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. शेवटच्या क्षणापर्यंत ते लोकसेवा आणि समाजसेवेसाठी समर्पित राहिले. त्यांच्या जाण्याने पक्षाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. ओम शांती!”
पंतप्रधान मोदींसोबतच गृहमंत्री अमित शाह यांनीही सर्वेश सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. अमित शाह यांनी त्यांच्या X हँडलवर लिहिले की, “मुरादाबादमधील आमचे भाजप उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाच्या बातमीने मन खूप दु:खी झाले आहे. काही दिवसांपूर्वीच मी त्यांच्या प्रचारासाठी मुरादाबादला गेलो होतो आणि दरवेळेप्रमाणे मी त्यांच्याशी सौहार्दपूर्ण भेट घेऊन चर्चा केली. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांसाठी तसेच मुरादाबादमधील सर्व लोकांसाठी आणि भाजप परिवारासाठी कधीही भरून न येणारे नुकसान आहे. मी शोकाकुल परिवार आणि त्यांच्या समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या चरणी दिवंगत आत्म्यास शांती देवो, ओम शांती.”
यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही शोक व्यक्त करत म्हटले आहे की, “भाजपचे उमेदवार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील माजी खासदार कुंवर सर्वेश सिंह यांच्या निधनाने मला धक्का बसला आहे. भाजप परिवाराचे हे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. प्रभू श्री राम दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणी शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबीयांना आणि त्यांच्या समर्थकांना हे नुकसान सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना, ओम शांती!”, असे योगी आदित्यनाथ म्हणाले.