PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (21 एप्रिल) जागतिक कल्याणासाठी भारताच्या वचनबद्धतेवर भर दिला आणि सांगितले की, भारत फक्त जगातील सर्वात जुनी जिवंत सभ्यता नाही तर मानवतेसाठी सुरक्षित आश्रयस्थान देखील आहे. आपला देश केवळ स्वत:चा नाही तर संपूर्ण मानवतेचा विचार करतो, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील भारत मंडपम येथे भगवान महावीर निर्वाण महोत्सवाला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारत फक्त जगातील सर्वात जुनी जिवंत सभ्यता नाही तर मानवतेसाठी सुरक्षित आश्रयस्थान देखील आहे. हा भारत आहे जो अहंकाराचा नाही तर स्वतःचा विचार करतो. भारताचा मर्यादांवर विश्वास नसून अनंतावर विश्वास असल्याचे मोदी म्हणाले.
आज संघर्षात सापडलेले जग भारताकडून शांततेची अपेक्षा करत आहे. भारताच्या या नव्या भूमिकेचे श्रेय आमच्या वाढत्या क्षमतेला आणि परराष्ट्र धोरणाला दिले जात आहे, पण मला सांगायचे आहे की, यामध्ये आमच्या सांस्कृतिक प्रतिमेचा मोठा वाटा आहे. आज भारत या भूमिकेत आला आहे कारण आम्ही जागतिक व्यासपीठावर सत्य आणि अहिंसा पूर्ण आत्मविश्वासाने मांडतो. आम्ही जगाला सांगतो की जागतिक संकट आणि संघर्षांवर उपाय भारताच्या प्राचीन संस्कृती आणि परंपरेत आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.