Thalapathy Vijay : लोकसभा निवडणूक 2024 (Loksabha Election 2024) चे पहिल्या टप्प्यातील मतदान 19 एप्रिल रोजी पूर्ण झाले. तामिळनाडूमध्ये झालेल्या पहिल्या मतदानात दक्षिणेतील अनेक अभिनेत्यांनीही मतदान केले. यामध्ये जेव्हा अभिनेता-राजकारणी बनलेला जोसेफ विजय ज्याला थलापती (Thalapathi Vijay) म्हणून ओळखले जाते, तो मतदान करण्यासाठी आला तेव्हा त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आता जोसेफ विजयविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. IndiaGlitz नुसार, 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानादरम्यान लोकांना व्यत्यय आणि गैरसोय झाल्याबद्दल एका सामाजिक कार्यकर्त्याने अभिनेत्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
असेही म्हटले जाते की, विजय मतदानासाठी आला तेव्हा त्याने 200 हून अधिक लोकांना सोबत आणले होते. त्यामुळे तामिळनाडूच्या नीलंकराई येथील मतदान केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तथापि, या वृत्ताची पुष्टी करण्यासाठी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केले गेले नाही किंवा अभिनेत्याच्या टीमकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मतदान केंद्राचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये चारही बाजूंनी विजयला घेराव घालताना दिसत आहे.
सोशल मीडियावर असे आणखी बरेच व्हिडिओ व्हायरल झाले आहेत, ज्यात विजय मतदान केंद्रावर सर्वत्र पुरेशी सुरक्षा असूनही गर्दीत दिसत होता.