Arvind Kejriwal : तिहार तुरुंग प्रशासन आणि आम आदमी पार्टी (AAP) यांच्यात सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांनी तिहार तुरुंग अधीक्षकांना पत्र लिहून तुरुंग प्रशासनाच्या वक्तव्यावर चिंता व्यक्त केली आहे. इन्सुलिन आणि एम्सच्या डॉक्टरांनी त्यांना कोणतीही गंभीर समस्या नसल्याचे सांगितले आहे.
पत्रात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले, “मी वृत्तपत्रात तिहार प्रशासनाचे विधान वाचले. विधान वाचून मला वाईट वाटले. तिहारची दोन्ही विधाने खोटी आहेत. मी रोज इन्सुलिन मागतो. मी ग्लुकोज मीटर दाखवले सांगितले की, दिवसातून तीन वेळा शुगर खूप जास्त येत आहे, माझी शुगर 250 ते 320 च्या दरम्यान जात आहे.”
“मी दररोज इन्सुलिनची मागणी करत आहे. मी त्यांना हे देखील दाखवून दिले की माझी साखरेची पातळी दररोज 160-200 च्या दरम्यान आहे. जवळजवळ दररोज, मी इन्सुलिनची मागणी केली. मग तुम्ही असे विधान कसे करू शकता की मी इन्सुलिनचा मुद्दा कधीच काढला नाही?”, असा सवालही अरविंद केजरीवालांनी उपस्थित केला.
पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी एम्सच्या डॉक्टरांच्या विधानावर चिंता व्यक्त केली की काळजी करण्यासारखे काही नाही. “एम्सच्या डॉक्टरांनी काळजी करण्यासारखे काही नाही असे कधीच सांगितले नाही. एम्सच्या डॉक्टरांनी रिपोर्ट पाहून सल्ला देतील असे सांगितले आहे. तिहार प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत आहे.”
तिहार प्रशासन राजकीय दबावाखाली खोटे बोलत असल्याचेही केजरीवाल म्हणाले. “तुम्ही राजकीय दबावाखाली खोटी विधाने केलीत याचे मला दु:ख झाले आहे. मला आशा आहे की तुम्ही कायदा आणि संविधानाचे पालन कराल”, असेही केजरीवाल म्हणाले.
दरम्यान, आप नेते आतिशी यांनी सोमवारी अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि तिहार अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आणि सांगितले की, केजरीवाल यांना तुरुंगात इन्सुलिन मिळू नये यासाठी कट रचला जात आहे.
“केजरीवाल यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉक्टरांचा सल्ला घेऊन इन्सुलिन सुरू करायचे आहे, असा अर्ज राऊस एव्हेन्यू कोर्टात दाखल केला होता. ईडी आणि तिहार प्रशासनाने या अर्जाला विरोध केला आहे. त्यांनी अरविंद केजरीवाल यांना इन्सुलिनची गरज नसल्याचे म्हटले आहे,” असे आतिशी म्हणाल्या.