पुणे : भारताचा हिंदुत्वाचा प्रवास, आध्यात्मिक विचार आणि विश्व मांगल्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी संघ कटीबद्ध आहे. भारताचे इप्सित कार्य हे विश्वएकता साध्य करणे आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह प्रचार प्रमुख प्रदीप जोशी यांनी केले.
भारतीय विचार साधनाच्या वतीने ‘अथातो संघजिज्ञासा’ व ‘अखंड भारत’ या पुस्तकांचे प्रकाशन नुकतेच पुण्यात झाले त्याप्रसंगी प्रदीप जोशी बोलत होते. मधुभाई कुलकर्णी यांनी रा. स्व. संघाचा प्रवास मांडणारे ‘अथातो संघजिज्ञासा’ तर ‘अखंड भारत’ हे डॉ. सदानंद सप्रे लिखित पुस्तक चित्तरंजन भागवत यांनी अनुवादित केले आहे. यावेळी रा. स्व. संघाचे पूर्वअखिल भारतीय संपर्क प्रमुख प्रा. अनिरुद्ध देशपांडे उपस्थित होते.
Tags: Akhand BharatBharatiya Vichar SadhanaBook PublishingPradip JoshipuneRSS