लोकसभा निवडणुकीत ४ जून रोजी निकाल येणार आहे. देशभरात अजून ६ टप्प्यांमधील मतदान बाकी आहे. मात्र त्याआधीच भाजपाने विजयाचे खाते उघडले आहे. होय सुरत मध्ये भाजपाने खाते उघडले आहे. सुरतचे भाजपाचे उमेदवार मुकेश हे विजयी झाले आहेत. कारण काँग्रेस उमेदवाराचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे सुरतची निवडणूक बिनविरोध झाली आहे. मुकेश दलाल हे विजयी झाले आहेत.
लोकसभा निवडणुकीत गुजरातमधून भाजपासाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे सुरतचे उमेदवार निलेश कुंभांनी यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. त्यानंतर सूत्रमधील इतर उमेदवारांनी देखील आपले अर्ज मागे घेतले आहेत. त्यामुळे भाजपाने १ जागेवर आपला विजय सुनिश्चित केला आहे. मुकेश दलाल हे बिनविरोध निवडून येण्यास आता कसलीही अडचण दिसून येत नाही. त्यामुळे भाजपाने आपले खाते उघडून आपल्या विजयाचा गुलाल उधळला असल्याचे म्हटले जात आहे.