देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण अमरावती लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण अमरावती लोकसभा मतदार संघाची माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी महायुती, मविआ आणि प्रहार पक्षात चुरशीची लढाई होणार आहे. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या पाठिंब्यावर नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्या होत्या. आता मात्र त्या भाजपच्या तिकिटावर अमरावतीमध्ये उभा राहिल्या आहेत. मात्र यंदा त्यांना जनता नावाचे अग्निदिव्य पार करावे लागणार आहे. भाजपात प्रवेश केल्यामुळे आणि जात प्रमाणपत्र वैध ठरल्याने त्यांचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. गेल्यावेळी त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मते त्यांना मिळाली होती. यंदा मात्र त्यांना भाजपा सोडून इतर मते आपल्याकडे खेचुन आणण्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. माविआचे सरकार असताना हनुमान चालिसाचे प्रकरण आपण सर्वाना माहिती आहेच. त्या प्रकरणातून नवनीत राणा यांची हिंदुत्वाची भूमिका अधिक स्पष्ट झाली आहे. हिंदुत्वासाठी काम करणारे अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
२०१९ च्या मोदी लाटेत अपक्ष निवडून आल्याने नवनीत राणा यांचे राज्यभरात कौतुक झाले होते. त्यांनी ५ लाखांपेक्षा जास्त मते घेत शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ यांचा पराभव केला होता. मात्र यंदा या निवडणुकीत प्रत्येक समाजाची भूमिका महत्वाची ठरणार आहे. अमरावतीमध्ये राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील विरोध सर्वश्रुत आहे. दरम्यान हा वाद विकोपाला पोहोचल्याचे दिसून येत आहे. प्रहार पक्षाचे नेते बच्चू कडून यांनी दिनेश बुब यांना रिंगणात उतरवले आहे. महायुतीत असून देखील माजी खासदार आनंदराव अडसूळ हे नवनीत राणांसोबत दिसून येत नाहीयेत. तर महाविकास आघाडीने दर्यापूरचे आमदार बळवंत वानखेडे यांना अमरावतीमधून लोकसभेचे तिकीट दिले आहे.
महायुतीत असून कडू यांचा राणा यांना विरोध आहे. आनंदराव अडसूळ देखील प्रचारात सोबत दिसून येत नाहीयेत. त्यामुळे या अंतर्गत बंडखोरी आणि नाराजीचा फटका नवनीत राणा यांना बसणार नाही याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. नवनीत राणा यांना पराभूत करणे हेच माझे लक्ष्य असल्याचे बच्चू कडून म्हणाले. दरम्यान या ठिकाणी चोरंगी लढत पाहायला मिळणार आहे. वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिल्याने रिपब्लिकन सेनेकडून आनंदराज आंबेड हे निवडणुकीत उभे राहिले आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये महायुतीच्या नवनीत राणा पुन्हा एकदा खासदार होणार की, अंतर्गत बंडखोरीचा, स्थानिक पक्षांच्या विरोधाचा फटका त्यानं बसणार हे पाहावे लागणार आहे. तसेच याचा फायदा माविआ किंवा दिनेश बुब, आनंदराज आंबेडकर यांना होतो हे देखील पाहणे महत्वाचे असणार आहे.