आज सर्वत्र चैत्र पौर्णिमेच्या दिवसाचे औचित्य साधत हनुमान जयंती साजरी होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला हनुमान जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. .
एक्स वरच्या आपल्या पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले आहेत की , “मी हनुमान जयंतीच्या देशभरातील माझ्या कुटुंबीयांना माझ्या शुभेच्छा देतो. पवनपुत्राचे समर्पण सर्व रामभक्तांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील. त्याच्या आशीर्वादाने, संकल्प विकसित भारताला नवी ऊर्जा मिळते जय बजरंगबली ! हयासोबत पंतप्रधानांनी एक व्हीडिओही शेयर केला आहे.
https://x.com/narendramodi/status/1782606097385189857
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील एक्स वर शुभेच्छा देत म्हटले आहे कि, “श्री हनुमान जन्मोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा. बजरंगबली तुम्हा सर्वांना शक्ती, बुद्धी, विवेक आणि दीर्घायुष्य देवो,”
https://x.com/AmitShah/status/1782590214692860150
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा म्हणाले, “मी देशातील सर्व जनतेला हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. मी प्रार्थना करतो की, पवनपुत्र हनुमान प्रत्येकाचे जीवन शक्ती, बुद्धी आणि ज्ञानाने भरेल.”
https://x.com/JPNadda/status/1782595670844612679
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज हनुमान जयंतीनिमित्त उत्तराखंडमधील ऋषिकेश येथील परमार्थ निकेतनला भेट देणार आहेत.
परमार्थ निकेतनचे अध्यक्ष पूज्य स्वामी चिदानंद सरस्वतीजी आणि परमार्थ निकेतनच्या आंतरराष्ट्रीय संचालिका पूज्य साध्वी भगवती सरस्वतीजी यांच्या हस्ते राष्ट्रपतींचे पारंपरिक स्वागत करण्यात येणार आहे. राष्ट्रपती हरिनाम संकीर्तन आणि भजनासाठी मंडळीत सामील होतील आणि प.पू. स्वामी चिदानंद सरस्वतीजी आणि पूज्य साध्वी भगवती सरस्वतीजी यांच्यासमवेत परमार्थ गुरुकुल ऋषीकुमार आणि भारत आणि जगभरातील यात्रेकरूंसोबत जगप्रसिद्ध गंगा आरती करतील.
हनुमान जयंती ही भगवान हनुमानाचा जन्म झाल्याच्या घटनेचा आनंद साजरा करण्यासाठी देशभरात केली जाते.
या शुभ प्रसंगी, जगभरातील भक्त उपवास ठेवतात आणि हनुमानाची पूजा करतात. संकटमोचनाला शांत करण्यासाठी आणि भगवान हनुमानाशी प्रार्थना करत भक्त हनुमान मंत्रांचा जप करतात.