Mantralay News : संपूर्ण राज्याला मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. शासनाच्या शालेय शिक्षण विभागातून तब्बल 47 लाख 60 हजार रूपये चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे सध्या राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेतील आरोपींना शालेय शिक्षण विभागाचे स्टॅम्प, बनावट चेक आणि स्वाक्षरीद्वारे 4 टप्प्यांमध्ये 47 लाख 60 हजार रूपये काढल्याची माहिती समोर आली आहे. काही अज्ञात चोरट्यांनी मंत्रालयातील बँक शाखेतून पैसे काढले आहेत. यामध्ये एकून चार व्यक्तींच्या नावे ही रक्कम जमा झाल्याची माहिती समोर आली आहे.
शिक्षण विभागाचे खाते हे मंत्रालयातील बँकेमध्ये आहे. तर या खात्यामधून चोरट्यांनी पैसे काढले आहेत. या प्रकरणाची माहिती मरीन ड्राईव्ह पोलिसांना देण्यात आली असून याचा पोलीस अधिक तपास करत आहेत.
ज्या चार लोकांत्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाली आहे ती सर्व खाती कोलकत्ता येथील असल्याती माहिती मिळाली आहे. तसेच तप कुमार, नमिता बग, प्रमोद सिंग आणि झितन खातून यांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा झाल्याची माहिती तपासात समोर आली आहे. तर या चौघांविरोधात आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या आरोपींचा शोध घेत आहेत.