Raj Thackeray : यंदा बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात पवार कुटुंबियांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. ननंद-भावजय या दोघींमध्ये लढत पहायला मिळणार आहे. शरद पवार गटाकडून खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना बारामतीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांना लढत देण्यासाठी महायुतीकडून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) या मैदानात उतरल्या आहेत. तर या निवडणूकीत सुप्रिया सुळेंना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादीसोबत शिवसेना आणि काँग्रेस आहे. आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आहे. पण आता मनसेसुद्धा सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहे.
आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देणार आहेत. नुकतीच अजित पवार यांच्या निवासस्थानी मनसेची बैठक झाली. या बैठकीत बारामती लोकसभा मतदारसंघाविषयी चर्चा झाली. तर या बैठकीत सुनेत्रा पवारांसाठी बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेचे तालुकास्तरीय मेळावे घेण्यात येणार आहेत.
तसेच सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज ठाकरेंची सभा होणार आहे. अद्याप या सभेचं ठिकाण आणि वेळ ठरलेली नाहीये. पण लवकरच याचं ठिकाण ठरवलं जाईल, अशी माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुधीर पाटसकर यांनी दिली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या या सभेकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.