Sushilkumar Shinde : लोकसभा निवडणुकांच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी जोरात तयारी केली आहे. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. कारण आज सोलापूरचे काँग्रेस नेते देवेंद्र कोठे (Devendra Kothe) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
देवेंद्र कोठे हे सुशीलकुमार शिंदे यांचे निवडणूक कॅम्पेन सांभाळणारे तात्या कोठे यांचे नातू आहेत. तर देवेंद्र कोठे यांनी आज देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरातील निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला.
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर देवेंद्र कोठे म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवत मी आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी मी पालकत्व स्वीकारत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं. तर सोलापूर लोकसभा मतदरासंघात नक्कीच भाजपच्या बाजूने निकाल असेल, असा दावा कोठेंनी केला.
देवेंद्र कोठे हे माजी नगरसेवक आहेत. ते महापालिकेच्या 2017च्या निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले होते. तर मागील काही दिवसांपासून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अशातच आज कोठेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.