देशभरात लोकसभा निवडणुकीचे बागुल वाजले आहे. सर्व पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. इंडिया आघाडीने एनडीएला यंदाच्या निवडणुकीत पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. तर एनडीएने केंद्रात तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी प्रचाराला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशभरात प्रचार सभांचा धडाका लावला आहे. तर नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रात महायुतीने ४५ प्लस मिशन डोळ्यांसमोर ठेवले आहे. आज आपण बुलढाणा लोकसभा मतदारसंघाविषयी माहिती जाणून घेणार आहोत. तिथे महायुती आणि महाविकास आघाडीने कोणाला उमेदवारी दिली आहे. राजकीय ताकद कशी आहे. तेथील प्रश्न कोणते आहेत, हे जाणून घेणार आहोत.
आज आपण बुलढाणा लोकसभा मतदार संघाची माहिती जाणून घेणार आहोत. या ठिकाणी महायुती, मविआ आणि आणि अन्य उमेदवारांविषयी जाणून घेणार आहोत. बुलढाणा लोकसभेसाठी २६ तारखेला मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात बुलढाण्याचे निवडणूक चुरशीची झाली आहे. यंदा पक्षीय उमेद्वारांबरोबरच अपक्ष उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. बुलढाण्यात महायुतीने विद्यमान खासदार शिवसेनेचे प्रतापराव जाधव तर महाविकास आघाडीने ठाकरे गटाचे नेते नरेंद्र खेडेकर यांना उमेदवारी दिली आहे. यंदा आमदार राजेंद्र शिंगणे महायुतीसोबत असल्याने प्रतापराव जाधवांचे मतविभाजन टळणार आहे. त्यात एक महत्वाची बाब म्हणजे प्रतापराव जाधवांनी प्रचाराच्या वेळेस ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी शिवसेनेत आले आहेत.
अनेक संघटना किंवा पक्षांनी केल्याने माविआच्या उमेदवार नरेंद्र खेडेकरांना फटका बसण्याची शक्यता आहे. बुलढाणा काँग्रेसमध्ये गटबाजी पाहायला मिळत आहे. यंदाच्या निवडणुकीत शिवसेना आणि पूर्वीची शिवसेना आणि आताचे ठाकरे गट यांची कसोटी लागणार आहे. फक्त उमेदवारांची नव्हे तर अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. बुलढाण्यात वंचित बहुजन आघाडीने वसंत मगर या नवख्या उमेदवाराला संधी दिली आहे. या ठिकाणी शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष उभे राहिले आहेत. संदीप शेळके देखील अपक्ष उभे राहिले आहेत. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांना जनतेचा मात्र त्यांना मिळणार प्रतिसाद मतांमध्ये परावर्तित होतो का हे पाहायला हवा. नवख्या उमेदवार जनता संधी देते की अनुभवी नेत्यालाच मत देते हे पाहणे महत्वाचे असेल.
या लढतीत मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. प्रत्येक उमेदवाराच्या मागे कोणता समाज कशाप्रकारे उभा राहतो यावर हे मतविभाजन कसे होते हे ठरण्याची शक्यता आहे. वंचित बहुज आघाडीचा उमेदवार किती मते घेतात, अपक्ष उभे राहिलेले किती मत घेतात यावर पक्षीय लढतीतील उमेदवारांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. या मतविभाजनचा फटका कोणाला बसणार हे ४ जून रोजीच स्पष्ट होणार आहे. मात्र दोन्ही पक्षांचे स्टार प्रचारक कशाप्रकारे प्रचार करतात , बूथ पातळीवर कशाप्रकारे नियोजन होते यावर बुलढाण्याची जागा कोण जिंकणार हे ठरणार आहे.