लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगलीची लोकसभा ठाकरे गटाकडे गेली आहे.लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सांगलीची लोकसभा ठाकरे गटाकडे गेली आहे. उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र सांगलीची जागा काँग्रेसला न मिळाल्याचे शल्य अजूनही स्थानिक नेत्यांमध्ये आहे. सांगलीच्या जागेवरून अजूनही काँग्रेसमध्ये नाराजी आहे. जागा आपल्याला मिळावी म्हणून आमदार विश्वजित कदमांनी दिल्लीचे दार देखील ठोठावले. आज विश्वजित कदम यांनी याबाबतची खदखद वरिष्ठ नेत्यांसमोर बोलून दाखवली.
विश्वजित कदमांनी सांगलीच्या जागेबाबतची खदखद नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर व्यक्त केली.सांगलीची जागा काँग्रेसला न मिल्ने हे चुकीचेच आहे. सांगलीतील आमचा घास हिरावून घेतला आहे. मित्रपक्षाला १०० टक्के काँग्रेसची मते मिळणार असल्याचे सांगा. पण पुढे विधानसभेला आवाज काढायचा नाही. लोकसभेत माविआच्या उमेदवाराला मतदान होईल. मात्र विधानसभेला पुन्हा वाद होणार नाही याची काळजी घ्या, असे विश्वजित कदम म्हणाले आहेत.
दरम्यान सांगलीत महायुतीने विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीने ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटील यां रिंगणात उतरवले आहे. तर, नाट्यमय घडामोडीनंतर विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सांगलीत तिरंगी लढत होणार आहे. मात्र महाविकास आघाडीतील उमेदवारी न मिळाले पण इच्छुक असलेल्या उमेदवाराने अपक्ष फॉर्म भरल्याने या ठिकाणी महाविकास आघाडीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.