लोकसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या आहेत. दरम्यान या तक्रारी काँग्रेसने भाजपाविरुद्ध व भाजपाने काँग्रेविरुद्ध केल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाने निवडणूक उल्लंघनाच्या तक्रारींवर भाजप आणि काँग्रेसकडून उत्तर मागितले आहे. आचारसंहिता भंगाच्या तक्रारींनंतर आयोगाने भाजप आणि काँग्रेसला नोटीस पाठवली आहे. आयोगाने दोन्ही पक्षांना २९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्या भाषणांबाबत निवडणूक आयोगाने ही नोटीस जारी केली आहे.