Murlidhar Mohol : आज (25 एप्रिल) पुणे लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे (BJP) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे कौतुक केले.
पत्रकारांशी बोलताना मुरलीधर मोहोळ यांनी भाजपचे कौतुक केले. ते म्हणाले की, “माझ्यासारख्या बूथ कार्यकर्त्याला भाजपच संधी देऊ शकते. आज मी एका लोकसभा मतदारसंघातून उमेदवार झालो आहे. बूथ कार्यकर्त्यांना न्याय कसा द्यायचा हे भाजपचे वैशिष्ट्य आहे.”
“माझी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. मी 30 वर्षांची राजकीय सेवा केली आहे. तर आज मी उमेदवारी दाखल करत असल्याचा माझा पक्ष, कार्यकर्ते आणि माझ्या कुटुंबीयांना आनंद होत आहे”, असेही मोहोळ म्हणाले.
विशेष म्हणजे मुरलीधर मोहोळ यांनी उमेदवारी दाखल केली तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार, पुणे अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे आणि भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या.